
नाशिकरोड:-( प्रतिनिधी ) नाशिक तालुक्यातील सामनगाव येथील सुप्रसिद्ध कवी सुभाष उमरकर यांची पाचव्या साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनात रंगणाऱ्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
रिसोड तालुक्यातील गोभणी येथील ग्रामनाथ एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने साहित्य जगत मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या संदर्भात साहित्य जगत (मासिक), ग्रामनाथ एज्युकेशन ॲण्ड सोशल वेलफेअर सोसायटी, गोभणी आणि भगवान राईतकर सर साहित्य मित्र मंडळ यांची सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी कवी सुभाष उमरकर यांची निवड करण्यात आली. सुभाष उमरकर यांचा ‘अंतर्मनाचे तरंग’ हा अलकसंग्रह प्रकाशित झाला आहे. राज्यभरातील विविध नियतकालिकांमधून उमरकर यांच्या कविता प्रकाशित होत असतात. साहित्याला समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

