
नाशिक (प्रतिनिधी) क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दातली येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य एम. एस. पठाण यांच्या हस्ते सरस्वती माता व श्री संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचे औक्षण करून पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत त्यांचा सन्मान केला.
यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुंचे जीवनातील महत्त्व मनोगताद्वारे व्यक्त केले. प्राचार्य एम. एस. पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “निसर्ग हाच आपला सर्वश्रेष्ठ गुरु असून त्याच्याकडून शिस्त, संयम, सातत्य आणि जीवनमूल्ये शिकण्यास मिळतात,”असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बोडके सर भडांगे सर व , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.🙏🙏🌹🌹

