
नाशिकरोड:( प्रतिनिधी)- पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी धन्वंतरी गायधनी, ईश्वरी आडके, वेदिका आडके, सार्थक सानप, पूजा मुठाळ, साई चौधरी आणि कल्याणी मोरे यांनी गुरूंबद्दल अतिशय उदबोधक विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अरुण पगार यांनी विचार मांडताना आपल्या आयुष्यात गुरूंचे स्थान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शिक्षक संजय शिरसाठ यांनी आपल्या भाषणात महाभारतातील एक प्रसंग सांगत विचार मांडले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनीही ‘गुरू माझे’ ही कविता सादर केली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि कर्मचारी यांचा गुलाबपुष्प प्रदान करत सन्मान केला. शिक्षक बाळासाहेब गायधनी यांनी आभार मानले.

