
सिन्नर (प्रतिनिधी)
श्यामसुंदर झळके
श्री दशनाम गोसावी समाज संस्था सिन्नर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच सिन्नर येथील वारकरी भवनात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा हा 26 व्या वर्षाचा कार्यक्रम नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ गोसावी होते. यावेळी अखिल भारतीय दशनाम गोस्वामी महासभेचे राष्ट्रीय सचिव ए. जी. गोसावी, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त श्याम गोसावी, समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनुप गोसावी, स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी, श्री गुरु शंकराचार्य समाज सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, गोसावी सेनेचे राज्याध्यक्ष कैलास गोसावी,

तसेच समाज संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश गोसावी, संजय गोसावी, माजी अध्यक्ष भानुदासपुरी गोसावी, राजेंद्र गिरी, रतनपुरी गोसावी, दिलीप गोसावी, रविंद्र गिरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी चौथी, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह दहावी, बारावी, पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व यश निवड नियुक्ती प्राप्त समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, रोख बक्षिसे व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने केशव गोसावी तसेच जिल्हा व तालुका समाज संस्थेच्या वतीने पाच सायकलींचे वितरण करण्यात आले. दौलत गोसावी यांनी स्मृतिचिन्हे, राजेंद्र भास्करपुरी यांनी शैक्षणिक साहित्य, तर लालगिरी गोसावी, काशिनाथ गोसावी आणि कमल गोसावी यांनी रोख रकमेची बक्षिसे प्रदान केली. याशिवाय सिन्नर तालुक्यातील अनेक समाजबांधवांनी रोख व वस्तूरूपाने बक्षिसांसाठी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमानंतर भैरवनाथ गोसावी, छगन गोसावी, ब्रह्मगिरी गोस्वामी आणि सुरेश गोसावी यांच्या वतीने उपस्थित विद्यार्थी, पालक व समाजबांधवांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सरचिटणीस वसंत गोसावी यांच्यासह दौलत गोसावी, छगन गोसावी, गुलाब गोसावी, शरद गोसावी, राजेंद्र गोसावी, विजय गोसावी, सौ. स्वाती गिरी आणि सौ. सविता गोसावी यांनी परिश्रम घेतले.
समाजातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा, गुणवंतांचा गौरव करणारा आणि शिक्षणाला नवी प्रेरणा देणारा हा सोहळा सर्वांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

