
मनमाड (प्रतिनिधी) मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृती निमित्ताने सीता लक्ष्मी हॉल, छत्रे न्यू इंग्लिश स्कूल येथे शुक्रवार दिनांक 31-07 -2026 रोजी सकाळी 9-30 ते दुपारी 02-00 या वेळेत आंतर शालेय कथाकथन स्पर्धा 2026 तसेच शनिवार दिनांक 01 -08 – 2026 रोजी सकाळी 9-30 ते दुपारी 02-00 पर्यंत आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा 2026 चे आयोजन केले आहे तसेच शनिवार दिनांक 01 -08 – 2026 रोजी याच स्पर्धेच्या ठिकाणी मनमाड सार्वजनिक वाचनालयतर्फे आयोजित निबंध, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रमुख अतिथी ख्यातनाम कवी,लेखक,गीतकार, चित्रकार आदरणीय विष्णूजी थोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे तरी वरील तिन्ही कार्यक्रमाला आपण उपस्थिती रहावे ही नम्र विनंती मनमाड सार्वजनिक वाचनालय


