
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३४८ वा दिवस

मोहरूपी मगराच्या जबड्यात लोक कसे सापडले आहेत ते पहा. अहो त्यांच्या हृदयभेदक किंकाळ्या ऐका ! पुढे व्हा, बंधनात अडकलेल्या लोकांना मुक्त करण्यासाठी, दुःखी लोकांचा दुःखभार हलका करण्यासाठी, अज्ञानी लोकांच्या हृदयातील घोर अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी हे वीर आत्म्यांनो पुढे व्हा. हृदयशून्य बुद्धीवादी लेखकांची आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या सहानुभूती शून्य लेखनाची कदापी पर्वा करू नका. बंधूंनो आपण निर्धन आहोत, आपण नगण्य आहोत, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य गोरगरिबांकडूनच ईश्वराने आजवर अनेक महान कार्य करून घेतली आहेत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण ९ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. ३१ जुलै २०२६
★ १८६५ शिक्षणतज्ञ, मुंबईचे दानशूर जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा स्मृतिदिन.
★ १९१८ प्रसिध्द संस्कृत पंडित, विवेकानंद केंद्राची “केंद्रप्रार्थनेचे” लिहिणारे दादासाहेब तथा श्रीधर भास्कर वर्णेकर यांचा जन्मदिन.
★ १९४० क्रांतिकारक सरदार उधमसिंह यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

