
आपले सर्वांचे लाडके विद्यार्थी प्रिय, शिक्षक, पालक प्रिय रुबाबदार, देखणे, सतत हसतमूख असणारे मनमिळावू संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचे पेङकाई संस्थेचे संचालक व छञपती शिवाजी हायस्कूल परधधाङी माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक श्री.प्रकाश सोनेज सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने ओळख निर्माण करतात, तर काही आपल्या स्वभावाने माणसे जोडतात. सोनेज सर असेच एक व्यक्तिमत्त्व आहे. ज्यांनी आपल्या मेहनतीने- जिद्दीने आणि प्रामाणिकपणाने शैक्षणिक श्रेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पी एन सोनेज सर म्हणजे शिक्षण क्षेत्रातील एक अनुभवी, कुशल आणि अभ्यासू दृष्टी असलेले एक चालते बोलते व्यासपीठ . त्यांच्या दृष्टि मधून टिपलेल्या अनेक गोष्टी शिक्षकान साठी फायदेशीर ठरल्या . हे यश त्यांच्या प्रतिभेची आणि ज्ञानाची व कौशल्याची साक्ष देणारे आहे. एखादा विद्यार्थी मधिल गुण हेरुन त्याला योग्य मार्गदर्शन व मार्गदर्शक देऊन घङविण्याचे काम सरांनच्या हातात अवगत आहे. त्यामुळेच त्यांचे शैक्षणिक कार्य असंख्य पालक, विद्यार्थी, शिक्षक, समाजाच्या मनात घर केले आहे.
मात्र जीवनाचा प्रवास नेहमीच सरळ नसतो. कोवीङ सारख्या महामारीच्या काळात संपूर्ण जग थांबले पण विद्यार्थ्यांना online शिक्षण देऊन मोठा आधार दिला . पी एन सोनेज सर यांचा परिस्थिती समोर हार मानणे त्यांच्या स्वभावच नाही . संघर्षाच्या त्या कठीण दिवसांत त्यांनी जिद्द, संयम आणि कष्ट यांच्या जोरावर मार्ग काढून विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवले.
काळ बदलला,परिस्थिती सुधारली AI सारख्या तंञज्ञानाच्या जगात सरांनी पुन्हा एकदा आपल्या आवडत्या विद्यार्थ्यांना AI चे प्रशिक्षण देऊन काळा सोबत चालण्याचे बळ दिले. त्यामुळे विद्यार्थी यांनी शैक्षणिक क्षेत्रात दमदार पुनरागमन केले. आजही ते त्याच उत्साहाने, त्याच निष्ठेने आपले काम करत आहेत. त्यांच्या जीवनप्रवासातून संघर्ष, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा प्रेरणादायी संदेश मिळतो.
प्रकाश सोनेज सर हे केवळ एक उत्तम मुख्याध्यापकच नाहीत तर संकटात धावून जाणारे, मित्रांना आधार देणारे आणि कोणालाही सहज मदतीचा हात देणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला आपलेसे करुन घेणे त्यांचे रुबादार व्यक्ती महत्व, प्रेमळ स्वभाव आणि माणुसकीची जाणीव होते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात भरभरून यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
आपल्या कर्तृत्वाचा ठसा असाच सदैव यशाची सुंदर शिकर गाठत राहो आणि आपल्या जीवनात इंद्रधनुष्या सारखे आनंदाचे रंग अधिकाधिक खुलत राहोत, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
आपला:– कवी काशिनाथ गवळी

