
आमोदा गावची शान आणि नांदगाव तालुक्याचा अभिमान असलेले, नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र भाऊ पगार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
आपल्या निर्भीड आणि अभ्यासू लेखणीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व्यक्तिमत्त्व अशी महेंद्र भाऊंची ओळख आहे. तालुक्यातील शेतकरी, गोरगरिबांचे प्रश्न त्यांनी नेहमीच आपल्या लेखणीतून मांडले आहेत.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही ते अग्रेसर आहेत. तालुक्यातील पत्रकारांना एकत्र करून “नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्था” स्थापन करून त्यांनी पत्रकारितेला एक व्यासपीठ दिले.
निर्भीडपणा, अभ्यास आणि माणुसकी या गुणांमुळे तालुक्यात त्यांना मानाचे स्थान निर्माण झाले आहे.
आई तुळजाभवानी महेंद्र भाऊंना उदंड, निरोगी आणि दीर्घायुष्य देवो. त्यांच्या लेखणीतून समाजजागृतीचे कार्य असेच सुरू राहो हीच शुभेच्छा .
शुभेच्छुक : सचिन बैरागी पत्रकार..
गणतंत्र न्यूज , नांदगाव तर्फे हार्दिक शुभेच्छा

