
राज्यस्तरीय संत कबीर
कवीराज पुरस्कार प्राप्त
अभंगकार
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती. ०८७७४८६०९
आदर्श,प्रामाणिक,सत्यप्रिय,जनप्रिय अधिकारी महाराष्ट्राचे FDA आयुक्त मा.श्री तुकाराम मुंढे साहेबांचे दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावती येथे आगमन होत आहे . त्यानिमित्त त्यांच्या सत्य,प्रामाणिक जनसेवेच्या कार्यावरील अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी शब्दबद्ध केलेला अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
सदाचारी तुकाराम मुंढे
अमरावतीला । तुकाराम आले ।
आनंदात न्हाले । जनमन ॥
अन्न व औषध । प्रशासन भार ।
भ्रष्टांवर वार । करितसे ॥
तुकाराम मुंढे । हिरा आहे छान ।
गावे गुण-गान। सर्वांनीच ॥
लोकहितासाठी । झटताहे मुंढे ।
सदाचारी मुंढे । तुकाराम ॥
महाराष्ट्री आज । तुकाराम नाम ॥
भ्रष्टांना लगाम । लावियली ॥
दररोज सुरू । सत्याची सफर ।
मुंढेंचा गजर । महाराष्ट्री ॥
कायद्याचे राज्य । समाजात हवे ।
जन गीत गावे । मुंढेजींचे ॥
भेसळ सम्राट I गल्लो गल्ली झाले ।
जनांना कळले । उशिराच ॥
बदलीला मुंढे । नाही घाबरले ।
कधी ना खचले । जीवनात
कडक शिस्तिचा । सत्य अधिकारी ।
कार्यालयी वारी । दररोज ॥
अफाट जिद्दीचे । तुकाराम एक ।
कार्य करी नेक । जनांसाठी ॥
भ्रष्टाचारी जना । रुचलाच नाही ।
पचलाच नाही । तुकाराम ॥
भ्रष्टाचाऱ्यांची ही । कंबर मोडली ।
तयांना घडली । जेलवारी ॥
सत्य कार्याला मी । करितो सलाम ।
करांनी प्रणाम । मुंढेजींना ॥
अमरावतीला । आज आगमन ।
आनंदले मन । सर्वांचेच ॥

