
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
कुंभमेळा तोंडावर असतानांच योग्य नियोजनाचा अभाव व ढिसाळ कारभाराचा तीव्र फटका श्रीक्षेत्र नाशिक व त्रंबकेश्वर पुण्यनगरीस बसला आहे. विकासाचे नावाखाली खोदलेले खड्डेमय रस्ते व पर्यायी मार्ग उपलब्ध न करुन दिल्याने शहरातील रहिवाशाचें दैनंदिन प्रवास करतानां मोठे हाल सुरु आहे. याचबरोबर बाहेरील प्रवासी व भाविक भक्त ही या प्रचंड दुरावस्थेबद्दल संताप व्यक्त करत आहे.
मुख्यमंत्री ना. देवेद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेण्याचे जाहिर केले होते.मात्र या दत्तक शहराकडे मुख्यमंत्री महोदयाचेंही अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.
विकासासाठी जनतेने केंद्र, राज्यासह महानगर पालिकेतही भाजपाकडे एकहाती सत्ता सोपवलेली आहे.मात्र विकास दुरच राहिला संपुर्ण शहरच खोदुन खड्डेमय केले गेले असुन त्यात पावसाळयाची अजुनच भर पडली आहे.
यामुळे अपघाताचींही मालिका सुरु असुन या बळी ला जबाबदार कोण ? असा सवाल नागरीक करत आहे.
कुंभमेळा तोंडावर आलेला असतानां अगदी अल्पकाळात डोंगर भर कामे उरकण्याची घिसाड घाई सुरु असुन या कामात ही मोठ मोठया कथित घोळाचां आरोप केला जात आहे.
दरम्यान खड्डेमय नाशिक वरुन तिहेरी इंजिनाच्या भाजप सरकार वर टिकेची झोड उठत असुन लोक समाजमाध्यमीवर रिल्स, मिम व विनोद टाकुन सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत आहे.

