
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३४९ वा दिवस

सखोलतेबरोबरच व्यापकता अंगी बाणावयास हवी. सखोलता गमावून बसू नये. आपण स्वरूपत: अनंत आहोत आपल्यामधील कशाच्याही विकासावर मर्यादा घालता यायची नाही. मनाला कोणत्याही एका विशिष्ट विषयात लावावयाचे नाही, तर खुद्द त्या मनाचाच विकास करावयाचा आणि ते सयंत करावयाचे. मग त्याला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही बाजूला वळवू शकाल. अशा रीतीने तुम्हाला सखोलता आणि व्यापकता वा उदार दृष्टी या दोघांचाही लाभ होईल. ज्ञान अशा तऱ्हेने अनुभवा की जणू ज्ञानाखेरीज आणखी काही जगात नाहीच; मग भक्तीयोग, राजयोग, कर्मयोग यांचीही अशाच तऱ्हेने साधना करा. लाटा सोडून समुद्राकडे जा, म्हणजे मग तुम्ही स्वतःच्या इच्छेनुसार निरनिराळ्या प्रकारच्या लाटा उसळू शकाल. तुमच्या स्वतःच्या मनरूपी तलावावर ताबा मिळवा, ते सयंत करा, एरवी तुम्ही दुसऱ्यांच्या मनरूपी तलावांचे तत्व वा स्वरूप कदापि समजू शकणार नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण १० शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२६
★ १८९९ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी व इंदिरा गांधी यांच्या मातोश्री कमला नेहरू यांचा जन्मदिन.
★ १९२० भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी नेते, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, भागवत गीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन.
★ १९२० लेखक, कवी, समाजसुधारक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती.

