
-न्यू मराठा हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतांना उपस्थित सर्व मान्यवर.

नाशिक(वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूल नाशिकमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे हे होते.व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रम इयत्ता ९वी तुकडी अ या वर्गाने सादर केला. प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.या नंतर विद्यार्थी मनोगत अच्युत तिडके ,अनुराग शेळके यांनी केले.शिक्षक मनोगतात उज्ज्वला पाटील यांनी लोकमान्य टिळक व आण्णा भाऊ साठे यांचे सामाजिक कार्य सांगितले. अध्यक्षीय मनोगतात ज्ञानेश्वर शिंदे यांनी टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना “भारतीय असंतोषाचे जनक” म्हटले. त्यांना “लोकमान्य” ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ “लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला” असा होतो. महात्मा गांधींनी त्यांना “आधुनिक भारताचा निर्माता” म्हटले.लाल-बाल-पाल
टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. टिळकांचे बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरबिंदो घोष, व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई आणि मुहम्मद अली जिना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांशी घनिष्ट संबंध होते.हे तर अण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी- आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.हे सांगितले कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन रूपाली शेडगे, मोनिका वडजे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.सुत्रसंचालन व आभार ईश्वरी पवार,तेजश्री गुंजाळ यांनी केले.

