
नांदगाव (प्रतिनिधी )-आण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक प्रतिमेस पुष्पहर व आदरांजली अर्पण करीत सारताळे आश्रमशाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी संस्था कोषाध्यक्षा तथा प्राथमिक आश्रमशाळा मुख्याध्यापिका नम्रता पगार मॅडम, जेष्ठ शिक्षक कैलास पगार, भगवान हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.सदर प्रसंगी साहित्य हे समाजालादिशा देणारं,परिवर्तनशील दर्जेदार असावं असं मत मांडत आश्रम शाळा प्राचार्य समाधान चौधरी यांनी प्रतिभावंत साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या दर्जेदार साहित्याची व स्वातंत्र्य संग्राम चळवळीतील लोकमान्य टिळक यांच्या योगदानची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली तर भगवान हिरे यांनी समाजातील पत्रकरितेची भुमिका नमुद करीत विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांचे विचार अंगीकरत आपल्या जीवनाची वाटचाल निश्चित करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रम प्रास्ताविक नितेंद्र सोळुंके यांनी केले तर सुत्रसंचालन मोतीलाल जगताप यांनी सांभाळेल. कार्यक्रम यशस्वीते साठी अशोक पाटील, गणेश पाथरे व इतर सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केलीत. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक, अधिक्षक, अधिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

