
लासलगाव, दि.१ ऑगस्ट (, प्रतिनिधी ) नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.रामनाथ कदम यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला तर प्रा.दत्तात्रय गायकवाड यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या निर्देशानुसार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस दिनांक १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. लेखन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि सर्व रा.से.यो. स्वयंसेवकांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

