
लोहोणेर येथील जनता विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करताना मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के यांच्यासमवेत उपस्थित शिक्षकवृंद. (छाया : सुनिल एखंडे)
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.इयत्ता पाचवी ‘अ’ ची विद्यार्थिनी आराध्या सूर्यवंशी हिने आपल्या मनोगतातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य व संघर्षमय जीवनाचा तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्ती, स्वराज्याची संकल्पना आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले.

