
सायखेडा-(प्रतिनिधी ):आज शनिवार दिनांक 1/8/2026 रोजी जनता इंग्लिश स्कूल सायखेडा या विद्यालयात पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सर्व मान्यवरांचे शालेय गीत मंचाने स्वागत गीताने सहर्ष स्वागत केले.त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजयजी कारे यांची निवड करण्यात आली..

तसेच याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे निफाड तालुका संचालक मा.श्री शिवाजी आप्पा गडाख व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा.श्री प्रभाकर डेर्ले साहेब,सायखेडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री मनोज भूतडा, ज्यू.कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री कमलाकांतचार्य महाराज,शालेय समिती सदस्य मा.श्री नितीन गावले, हे उपस्थित होते. तसेच या वेळी मंचावर सामाजिक कार्यकर्ते मा.श्री आश्पाक शेख विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री यु.के पवार सर पर्यवेक्षक मा. श्री पगार सर, श्रीम.रश्मी पुराणिक,सौ मनीषा कुटे उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने माता-पालक व पालक उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री पवार सर यांनी प्रास्ताविक केले व शाळेतील विविध उपक्रमाविषयी उपस्थित पालकांना माहिती दिली.तसेच शिक्षक पालक संघ व माता पालक संघ व शिक्षक यांच्यात समन्वय साधण्याचे आवाहन केले. यावेळी शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून श्री.सचिन खालकर यांची तर,सहसचिव म्हणून श्री रामा कुटे यांची निवड करण्यात आली.

माता-पालक संघाच्या उपाध्यक्षपदी श्रीमती वृषाली कुटे व सहसचिव म्हणून श्रीमती उज्वला कुटे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी श्री प्रभाकर रायते सर यांनी मोबाईलचे दुष्परिणाम व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती मध्ये मोबाईलचा येणारा अडथळा या विषयी पालकांचे प्रबोधन केले. याप्रसंगी अनेक पालकांनी आपल्या समस्या मांडल्या व या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन मा. प्राचार्य साहेब यांनी दिले. मविप्र समाजाचे निफाड तालुका संचालक मा. श्री शिवाजी आप्पा गडाख यांनी विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर येणाऱ्या समस्या सोडविण्याचे व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे संस्था पातळीवर निराकरण करण्याचे आश्वासन पालकांना दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री विजय कारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक टर्ले सर व श्री अवधूत आवारे सर यांनी केले.श्री पंकज गांगुर्डे सर यांनी आभार प्रदर्शन केले व अशा रीतीने खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षक पालक मेळावा व माता पालक मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन श्रीमती कापडी मॅडम व श्री महाले सर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य पालक उपस्थित होते.

