
सोनांबे ता. 29: पाटोळे (ता. सिन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेत कामगार नेते जगदीशभाऊ गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते विलासभाऊ खताळे यांच्या संकल्पनेतून व संयोजनातून हा उपक्रम उत्साहात पार पडला.यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे महत्त्व सांगत शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारली पाहिजे,

असा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत नियमित अभ्यास करून गुणवंत होण्याचा संकल्प केला.कार्यक्रमास इंडिया सेक्युरिटी प्रेस युनियनचे जॉईंट सेक्रेटरी संतोष कटाळे, जनरल सेक्रेटरी अण्णासाहेब सोनवणे, माळेगाव येथील लिग्रा कंपनीचे माजी सेक्रेटरी सुनिल गायधनी, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रामहरी खताळे, निवृत्ती कराड, प्रकाश खताळे, पोलीस पाटील शिवाजी सदगीर, पंडित मंडले, मुख्याध्यापक वसंत गोसावी, पदवीधर शिक्षक सुनील जोरी, स्वाती खताळे, कैलास पवार, मीना सोनवणे, प्रतिभा पवार, प्रियंका वाघ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी विलासभाऊ खताळे यांचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

