
वासोळ:-(प्रतिनिधी )’मविप्र’ संचलित इंदिरा माध्यमिक विद्यालयात पालक मेळावा व माता पालक मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी वासोळ गावचे स्कुल कमेटीचे सदस्य श्री.वैभव केदारे होते. तसेच व्यासपीठावर वासोळचे सरपंच श्री.स्वप्निल पाटील, भारत आहिरे, गोरख भामरे बबलु पवार, नंदु केदारे हे होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस.व शालेय व्यवस्थापन समितिचे सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने माता व पालक देखील उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आहेर एस.सी.यांनी तर मा.मुख्याध्यापक श्री.केदारे एस.एस.यांनी प्रास्ताविकात शालेय गुणवत्ता व अडी अडचणी तसेच शिक्षक पालक संघाचे महत्व स्पष्ट केले. तसेच श्री. सावंत व्ही.बी. यांनी शाळेचा लेखाजोखा स्पष्ट केला. तसेच श्रीमती गुजर एस.एन.यांनी माता पालक समिती, सखी सावित्री समिती, विशाखा समिती स्थापन करुन महत्व विषद करण्यात आले. तसेच शालेय शिस्त, विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा इ.बाबत त्यांनी पालकांशी चर्चा केली. यावेळी पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून आपल्या पाल्यांच्या समस्या मांडल्या. तसेच शालेय गुणवत्तेचे देखील कौतुक केले. शिक्षक मनोगतात श्री.सावंत व्ही.बी.श्री.निकम एस.के.व श्री चौधरी आर.एस.यांनी शालेय प्रगतीचा लेखाजोखा मांडला तसेच शाळेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला. शालेय कामकाजात पालकांचा सहभाग व सहकार्य वाढवण्याचे आव्हान केले. तसेच सरपंच श्री.स्वप्नील पाटील यांनी पालकांना आपल्या पाल्यावर शिक्षणासाठी होणारा खर्च हिच आपली भविष्यातील गुंतवणुक आहे. व त्यांचे भविष्य उज्वल होईल असे मार्गदर्शन केले. अध्यक्ष श्री.वैभव केदारे यांनी आपल्या मनोगतात शालेय गुणवत्तेविषयी मार्गदर्शन केले. व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्याच्या सुचना केल्या. श्री.सावंत व्ही.बी.यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली व सहकार्य केले.

