
वासोळ इंदिरा माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतीथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतांना…
वासोळ:-(प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.केदार एस.एस. मुख्याध्यापक हे होते.
सुरवातीला विद्यार्थ्यांची भाषणे झाली. व नंतर अध्यक्षिय भाषण श्री.केदार सर यांनी लोकमान्य टिळकांविषयी विद्यार्थ्यांना माहीती सांगितली.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आहेर सर व आभार प्रदर्शन श्री.निकम एस.के यांनी केले.

