
मालेगाव (प्रतिनिधी)- येथील प.बा. काकाणी नगर वाचनालय मालेगाव येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी वाचनालयचे कार्यवाह मिलिंद गवांदे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम तापडे, सहकार्यवाह रविराज सोनार, ग्रंथपाल अजय जोशी, संजय जगताप, आप्पा जगताप यांचेसह वाचनालयाचे सन्माननीय सभासद राजीव वडगे, बळवंत अहिरे, डॉ दीपक कापडे यांचेसह वाचक उपस्थित होते.

