
नाशिक (प्रतिनिधी)सोमवारी तीन तारखेला जु.स. रुंगटा हायस्कूलमध्ये मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या उपस्थितीत मा.शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी अकरा वाजता आपल्याकडील प्रलंबित प्रश्नांच्या यादीसह व कागदपत्रे पुराव्यासह उपस्थित रहावे. सर्व प्रश्नांची एकत्रीकरण करून नियोजन करण्यात येईल.
- ऐन वेळेला उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे
- प्रश्नांची पुनरावृत्ती केल्यामुळे..
- आणि एकाच वेळेला अनेकांनी प्रश्न मांडल्यामुळे..
होणारा गोंधळ आपल्याला टाळता येईल.
तरी सहकार्य कराल अशी अपेक्षा.
सभेला शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत तरी आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुराव्यानिशी उपस्थित रहावे असे आवाहन
शिक्षक व शिक्षकेतर संजय चव्हाण ,विभागीय अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेना व शिक्षक सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष मधुकर वाघ व पदाधिकारी यांनी केले आहे.

