
लातूर:(प्रतिनिधी ) डॉ. स्मिता दीपक कोकणे यांची सहाय्यक संचालक, सहायक निधी लेखापरीक्षा, लातूर या पदावर पदोन्नती (प्रमोशन) झाल्याबद्दल कक्कया समाजाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.यावेळी समाजातील मान्यवरांनी डॉ. स्मिता कोकणे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पदोन्नतीमुळे समाजाचा गौरव वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या सत्कार समारंभास जांबुवंत सोनकवडे,श्रीमंत कावळे, गणेश सावळकर, मैलारीराज कावळे, महावीर कटके, सतीश कोकणे, दत्ता सोनकवडे, बालाजी कोकणे, तसेच डॉ. दीपक कोकणे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी डॉ. स्मिता कोकणे यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

