
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५१ वा दिवस

माणसाचे अंतिम ध्येय सुख नसून ज्ञान आहे. कारण सुख आणि आनंदाचा एक ना एक दिवस शेवटच होत असतो. सुख हेच परम ध्येय आहे असे समजणे ही माणसाची मोठी घोडचूक असते. जगातील सगळ्या दुःखांचे मूळ हेच आहे की मानवाने अज्ञानामुळेच सुख हेच त्याचे अंतिम ध्येय मानले आहे, पण काही काळानंतर माणसाला हा बोध होतो की ज्याकडे तो जात आहे ते सुख नसून ज्ञान आहे. सुख आणि दुःख दोघेही महान शिक्षक आहेत आणि जेवढे ज्ञान त्याला सुखाकडून मिळते तेवढेच दुःखाकडूनही मिळत असते. ज्याप्रमाणे चकमक दगडात अग्नी साठलेला असतो त्याचप्रमाणे मानवाच्या मनात ज्ञान राहत असते. फक्त घर्षणानंतर हा ज्ञानाग्नी प्रकाशित होत असतो.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण १२ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. ३ ऑगस्ट २०२६
★ १९०० स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे संस्थापक, कम्युनिस्ट पक्षाचे खासदार, क्रांतीसिंह नाना पाटील यांची जन्मदिन.
★ १९४८ पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
★ १९५७ ‘हिंदूस्थान टाईम्सचे’ संपादक, पत्रकार महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचा स्मृतिदिन.

