
सेलू, ( प्रतिनिधी). : बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल, सेलू येथे शैक्षणिक सत्र २०२६–२७ साठी विद्यार्थी पदग्रहण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभात नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना पदाची जबाबदारी स्वीकारून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याची शपथ देण्यात आली.
समारंभात नव्या विद्यार्थी परिषदेला बॅज व पदचिन्हे प्रदान करून त्यांच्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रितू श्रीवास्तव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेतृत्व हे केवळ पद नसून जबाबदारी, शिस्त, सेवाभाव आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगितले. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कृतीतून इतरांसाठी आदर्श निर्माण करावा, असे त्यांनी आवाहन केले.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. भावनाताई बोर्डीकर (मुंगसे) यांनी सर्व नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समारंभास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह, शिस्त आणि नेतृत्वगुणांचा संगम असलेला हा विद्यार्थी पदग्रहण समारंभ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमाचे आकर्षक व प्रभावी सूत्रसंचालन कु. हरिप्रिया घांडगे आणि कु. समृद्धी जैस्वाल यांनी केले.

