
मिरजेच्या समृद्ध संगीत परंपरेमध्ये व्हटकर कुटुंब हे विशेषतः ‘तबला निर्मितीच्या परंपरेसाठी’ प्रसिद्ध आहे. आज त्यांची चौथी पिढी या उद्योगात आहे.
म्युझिकल टुरिझममधील समावेश: मिरजेत सुरू झालेल्या देशातील पहिल्या ‘म्युझिकल टुरिझम’ (संगीत पर्यटन) सफरीमध्ये व्हटकर कुटुंबाची ही तबला निर्मितीची परंपरा पर्यटकांना दाखवली जाते आणि त्याबद्दलची माहिती दिली जाते.

व्हटकर कुटुंबीयांची तबला निर्मितीची चार पिढ्यांची ही परंपरा अभिमानास्पद असून तबलावादक झाकीर हुसेन सारख्या अनेक प्रसिद्ध तबलावादकांनी व्ह्टकर कुटुंबीयांचे कौतुक करून प्रशस्तीपत्रक दिलेले आहे.
ढोर कक्कय्या समाजाला ही बाब अत्यंत अभिमानाची आहे.

