
नाशिकरोड (प्रतिनिधी) येथील ब्राह्मण सभेच्या वतीने संस्थेच्या सभागृहात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव उत्साहात साजरा झाला.
ब्राह्मण सभेचे विश्वस्त कमलाकर कुलकर्णी यांच्याअध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे नौदलातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि गारगोटी संग्रहालयाचे संचालक के.सी.पांडे, संस्थेचे आधारस्तंभ आणि विश्वस्त अनिल कुलकर्णी मंचावर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे के.सी.पांडे यांनी भाषणात आपल्या गारगोटी संग्रहालयाची सविस्तर माहिती करून देत विद्यार्थ्यांनी निराश न होता जिद्द, संस्कार आणि शिक्षणाच्या सहाय्याने प्रतिकूल परिस्थितीत नाउमेद न होता धैर्याने सामोरे गेल्यास यश दूर नसते, हे सांगत स्वानुभव कथन केले. कार्यक्रमाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी यांनी संस्थेच्या प्रगतिपथावर असलेल्या बांधकामाविषयी सविस्तर माहिती देत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्या संस्थेच्या इमारतीत करण्यात येणाऱ्या निवासाबाबत आणि त्या अनुषंगाने आर्थिक मदतीचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वस्त अनिल कुलकर्णी, कार्याध्यक्ष सुरेश कुलकर्णी, रवींद्र चंद्रात्रे, शिरीष कुलकर्णी, सुनील मेंढेकर, संकेत मेंढेकर, सारंग धरणगावकर, जयंत देशपांडे, किरण हिंगणे, नंदकिशोर ठोंबरे, उदय धर्माधिकारी, महिलाध्यक्षा मंदाकिनी शेरीकर, अनघा कुलकर्णी, दिलीप भिंगारकर, दीपाली भिंगारकर, निशा कपोले, शुभदा देशपांडे, शोभना व्यवहारे, सुनंदा हिंगे, रवींद्र वैद्य, राजेंद्र कुलकर्णी, यांनी विशेष परिश्रम घेतले. अनघा-जोशी पोटे यांनी सादर केलेल्या "जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा" या सुरेल स्वागतगीताने आणि दीपप्रज्वलनासह प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जयंत देशपांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. वैजयंती चंद्रात्रे यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार राजीव व्यवहारे यांनी आभार मानले


