
मालेगाव ( प्रतिनिधी)समाजश्री प्रशांतदादा हिरे कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य व सुरक्षा समिती अंतर्गत ”सायबर गुन्हे व सुरक्षा” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते आरोग्य व सुरक्षा समितीचे प्रमुख प्रा.अमित सोनवणे यांनी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु बी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. प्रा सागर काळे साहेब(API जायखेडा ) त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून सायबर गुन्हे कसे होतात व त्यापासून कसे सुरक्षित रहावे याविषयी महत्त्वपूर्ण व्याख्यान दिले व विद्यार्थ्यांचे सायबर गुन्ह्यातील शंकाचे निरसन केले तसेच विद्यार्थ्यांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल कशी करावी व शिक्षण घेताना नियोजनबद्ध रहावे सर्व प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहिले पाहिजे. मोबाईलचा उपयोग ज्ञान विज्ञानासाठी करताना वाढत्या सायबर क्राईमचे बळी पडू नये म्हणून स्वतःची काळजी कशी घ्यावी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले

प्रमुख उपस्थितीत विनोद पाटील यांनी पाऊल उचलताना मुला मुलींनी आई-वडिलांचाही विचार करावा व यशस्वी होण्यासाठी संस्कार आणि शिस्त यांची सांगड घालून वाटचाल करावी असे आवाहन करताना अभ्यासाकडे लक्ष द्यावे या संदर्भात मार्गदर्शन केले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु बी कदम यांनी अध्यक्षनीय भाषणात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सायबर क्राईम घडू नये यासाठी काळजी घ्यावी तसेच अनेक युगांपासून विद्यार्थ्यांना सुरक्षित कसे राहायचे आणि गोपनीयता कशी पाळायचे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिल सावळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम व्ही दासनूर शैक्षणिक पर्यवेक्षक आर एस बागुल व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ए एस सोनवणे आभार प्रदर्शन प्रा आर एस बागुल यांनी केले.

