
नाशिक, ऑगस्ट 2026 : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालय, नाशिक येथील संगणक शास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी “इंडक्शन प्रोग्राम” चे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम पंजाबराव देशमुख सभागृह, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व संस्था गीताने झाली. त्यानंतर संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एच. बेंडाळे यांनी प्रास्ताविक केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, कौशल्य आणि तंत्रज्ञान आत्मसात करून उज्ज्वल भविष्य घडवावे असे सांगितले. सरस्वती नगर कॅम्पसचे समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलिकर यांनीही समन्वयक भाषणातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या सुविधा व संधींबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सौरभ भोसले, टेक्निकल लीड, KPIT Technologies, पुणे हे उपस्थित होते. त्यांनी “AI आणि Cyber Security चे करिअरमधील महत्त्व” या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मार्क्स हे शॉर्टलिस्ट करतात तर स्किल्स आपल्याला सिलेक्ट करतात. व हे करत असताना इंटरशिप ही विद्यार्थी रुपी दगडाला मूर्तीत साकारण्याचे काम करते, बदलत्या तंत्रज्ञानासोबत विद्यार्थ्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे असे आवाहन केले.
यावेळी डॉ. ए. एच. बेंडाळे यांनी विभागाचा सादरीकरणाद्वारे आढावा घेतला. तसेच NSS, TPO, SWO, परीक्षा, क्रीडा, ग्रंथालय, अविष्कार, करिअर कट्टा या विविध विभागांनी त्यांच्या उपक्रमांची PPT द्वारे माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँकरने केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका *सुजाता तरले यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास संगणक शास्त्र विभागाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रथम वर्षाचे नवप्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

