
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३७० वा दिवस

*मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि।*
किम्वदन्तीति सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत्।।
मी मुक्त आहे ही भावना ज्याची सतत जागृत असते तो मुक्त होतो, जो सदान्कदा ‘मी बद्ध, मी बद्ध’ असे उगाळीत बसतो तो जन्मोजन्म बद्धच राहतो. ऐहिक असो वा पारमार्थिक असो, साऱ्याच बाबतीत हेच तत्त्व सत्य आहे हे लक्षात ठेव. ऐहिक जीवनात जे नेहमी निराश चित्ताचे असतात, नेहमी कपाळाला हात लावून बसतात, त्यांच्याकडून कुठलेच कार्य होत नाही. मन आणि वाणी ही अत्यंत प्रभावी असायला हवीत. ‘मी हीन मी दीन’ असे सतत घोकत राहिल्यानेच माणूस हीन दिन होऊन जातो शास्त्रेही म्हणूनच तेच सांगतात.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण ३१ शके १९४८
★ श्रावण शुध्द /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२६
★ १९८२ विवेकानंद शिलास्मारक निर्माण हेच “एक जीवन एक ध्येय” म्हणून जगलेले, कन्याकुमारी स्थित विवेकानंद शिलास्मारकाचे निर्माते व विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रामकृष्ण रानडे यांचा स्मृतिदिन.
★ मा. एकनाथजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

