
मालेगाव( प्रतिनिधी)
आज शहीद नरेंद्र दाभोलकर यांच्या शहीद दिनानिमित्त मालेगाव अंनिस शाखेने मालेगावमधील विविध शाळांमध्ये भारतीय संविधान प्रत व जादुटोणा विरोधी कायदा पुस्तिका भेट देण्यात आली. का.र.शाह प्राथमिक विद्यालय, र.वि.शाह माध्यमिक विद्यालय, झुं.प.काकाणी विद्यालय, सौ.रु.झुं.काकाणी कन्या विद्यालय,या.ना.जाधव विद्यालय व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका या ठिकाणी भारतीय संविधान प्रत व जादुटोणा विरोधी कायदा पुस्तिका भेट देण्यात आली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका येथे शहीद नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनीना अंनिस जिल्हा कार्यवाह रविंद्र आहिरे यांनी जादुटोणा विरोधी कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली,श्रद्धा व अंधश्रद्धा यातील भेद सांगितला तसेच मुलींनी विवेकवादी व्हावेअसे आवाहन केले.अभ्यासिका संचालक पराग निकम यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी अंनिस सदस्य रोहित तेली,योगेश कळमकर,वसीम पठाण,मोहन झुंजारराव व दबंग यादव उपस्थित होते.

