
डॉ.फेनाली पारेख-कोळी या मूळच्या पुण्याच्या असून त्यांचे शिक्षण पुण्यात झाले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मधून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. बायोटेक्नाँलॉजी करत असताना त्यांनी त्या काळात नव्याने विकसित होत असलेल्या नॅनो टेक्नॉलॉजी आणि सिल्व्हर ज्ञानू पार्टिकल्स या क्षेत्रात संशोधन केले. या काळात त्यांचे अनेक संशोधन पेपर्स प्रकाशित झाले आणि त्यांचे सुरुवातीचे संशोधन पुढील संशोधनांमध्येही संदर्भ म्हणून वापरले गेले.
एम.एस्सी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय केमिकल प्रयोगशाळेत (NCL), पुणे येथे संशोधक विद्यार्थी म्हणून काम केले. मात्र त्यांचे पुढचे ध्येय पीएचडी करण्याचे होते आणि तेही अमेरिकेत. त्यांची मोन्टाना स्टेट विद्यापीठ (MSU) येथील पीएचडी प्रोग्राम मध्ये निवड झाली आणि त्यांना पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली.
MSU मध्ये त्यांनी मायक्रोबायोलॉजी
आणि इम्युनालॉजी मध्ये पी.एच.डी. केली. पी.एच.डी. सोबतच त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून अंडरग्रज्युएट स्टुडंट ना जेनेटिक्स हा विषय शिकवला. तसेच हायस्कूल मधील मधील मुलींसाठी सायन्स सेमिनार घेऊन त्यांना सायन्स आणि रिसर्च क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले.
सुमारे साडेचार वर्षांत पी.एच. डी.पूर्ण केल्यानंतर त्यांच्या रिसर्च पेपर्स प्रतिष्ठित सायंटिफिक जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आणि त्यांच्या संशोधना चा संदर्भ 300 हून अधिक रिसर्च पेपर्स मधे देण्यात आला आहे.
पी.एच.डी. नंतर त्यांनी अमेरिकेतील ड्रग डेव्हलपमेंट कंपनी मध्ये सायंटीस्ट म्हणून काम सुरू केले. त्यांच्या रिसर्च टीमने ने पुढे विकसित केलेल्या कामासाठी पेटंट मिळवले.
नुकतीच त्यांची क्युबिओ इनोव्हेशन हब येथे मेंन्टार म्हणून निवड झाली. त्यांची क्युबिओ मधे बायोटेक स्टार्टअप चे फाऊंडर आणि रिसर्चस यांना प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि सायंटिफिक स्टार्टेजी बाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह , कॅन्सर, फुफ्फुसाचे विकार यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या बायोटेक कंपनीज आहेत.त्या नाशिक येथील वाय.डी.बिटको हायस्कूल, नाशिक च्या उपशिक्षिका सौ.सिमा कोळी व नाशिक मनपा चे सेवानिवृत्त शिक्षक श्री.भालचंद्र कोळी यांच्या स्नुषा आहेत.
या संशोधन व मेंन्टार निवडीच्या यशाबद्दल विविध मान्यवरांनी डॉ .फेनाली पारेख -कोळी यांचे अभिनंदन केले आहे.

