
मालेगाव (प्रतिनिधी)- जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त येथील मालेगाव फोटोग्राफर असोशियशनच्या वतीने दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला भजनी यंडाळासह दिंडी काढण्यात आली. भजनाच्या गजरात कॅमेरा, तसेच फोटोग्राफीच्या सामुग्रीची प्रतीकात्मक दिंडी एकात्मता चौक येथून कॅम्प रस्ता मार्गे मोसम पुलापर्यंत काढण्यात आली. आसोशिएशन सदस्यांच्या कुटुंबातील सदस्य यात सहभागी झाले होते.
दुसऱ्या दिवशी सटाणा रस्त्यावरील अमेय लॉन्स येथे जेष्ठ फोटोग्राफर भगवान देवबा बच्छाव, अनिल किसन परदेशी, किशोर विनायक त्रिभुवन, राजेंद्र गोविंद येवले यांचा बहुमूल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर संदीप जाधव यांचा होम मिनिस्टर हा मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला. त्यात सुमारे ३५ बक्षीसे वाटण्यात आली त्यात पहिल्या ३ विजेत्यांना पैठनी देण्यात आल्या. यात
प्रथम क्रमांक सुनीता जगदीश शेवाळे, द्वितीय क्रमांक गौरी गणेश जंगम, तृतीय क्रमांक हर्षाली चेतन सैंदाणे यांनी पटकावला. मान्यवरांच्या हस्ते पैठणी भेट देण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिराचेसुद्धा आयोजन करण्यात आले, त्याला सभासदांनी उत्तम प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक तथा माजी उपमहापौर निलेश आहेर, नगरसेवक प्रमोद (पमुदादा) बच्छाव, सौ. जान्हवी कासवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष तुषार जाधव, उपाध्यक्ष नितीन ठोके, सचिव गोकुळ दुसाने, सहसचिव सुधाकर शिरसाठ, खजिनदार बबलू शेवाळे, सह खजिनदार अमोल भावसार यांच्यासह फोटोग्राफर असोशियशनचे सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी ३०० पेक्षा जास्त सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.

