
काकासाहेबनगर शैक्षणिक संकुलात ध्वजारोहण करताना प्रमुख अतिथी धनंजय चांगदेवराव होळकर व इतर मान्यवर
रानवड ( प्रतिनिधी)
के के वाघ शैक्षणिक संकुल काकासाहेब नगर रानवड येथे 80 वा स्वातंत्र्य दिन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत आनंदात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धनंजय होळकर उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यांनी आपल्या मनोगत आतून आपण आपल्या राष्ट्राचे काहीतरी देणे लागतो त्या अनुषंगाने आपण राष्ट्रगीत जपत देशाच्या विकासासाठी प्रज्ञाशील राहण्याचे आवाहन केले.
इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी
आपली मनोगते व्यक्त करत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली वाहिली.
तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शरद कदम यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू करण्याची जबाबदारी ही पुढील पिढीची असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद पवार यांनी केले तर प्रा. गणेश आवारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी रानवड पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, रामनाथ पानगव्हाणे, रघुनाथ कोल्हे, कचूनाना शिंदे, वैभव कुशारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अतुल गवारे, इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य शरद कदम तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

