
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६६ वा दिवस

आपण मनुष्य आहोत. देवाने आपल्याला विचारशक्ती दिली आहे. ती यासाठी की आपण तिचा योग्य प्रकारे वापर करावा, यासाठी नाही की पशूंना कुणीही हाकून घेऊन जावे त्याप्रमाणे आपण देखील कोणीही येऊन काहीही ठासून सांगितले की त्याच्यामागे निमुटपणे चालू लागावे यास्तव मला असे वाटते की आपण आपल्या भूत आणि वर्तमान काळाविषयी सर्व तथ्य सारी माहिती गोळा केली पाहिजे आपला दैदिप्त्यमान इतिहास जाणून घेतला पाहिजे, त्यावर नीट विचार केला पाहिजे व त्याच्या आधारे भविष्याची योजना आखली पाहिजे. आपण निव्वळ भावनेच्या आहारी जाऊ नये.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण २७ शके १९४८
★ श्रावण शुध्द /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२६
★ मंगळागौरी पूजन
★ १७०० मराठाशाहीतील सर्वात कर्तबगार पेशवा, थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्मदिन.
★ १९०० भारताच्या प्रथम महिला कॅबिनेट मंत्री, मुसध्दी राजकारणी, राजदूत, १९५३ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष पंतप्रधान पंडित नेहरुंची बहिण विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्मदिन.
★ १९४५ आझाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिन.

