
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )भारतीय स्वातंत्र्यदिनी पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालय आणि आदर्श प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त कार्यक्रमात ध्वजारोहणासह दहावीच्या गुणवंतांचा सत्कार आणि ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमांतर्गत गरजूंसाठी शालोपयोगी साहित्यभेट असे विविधांगी उपक्रम संपन्न झाले. नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात पळसे ग्रामपंचायतीच्या प्रशासक आणि सरपंच शोभा गायधनी, माजी सरपंच ताराबाई गायधनी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर सानप, सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई गायधनी, कामगार नेते नामदेवराव गायधनी, भास्करराव गायधनी, सोमनाथ सानप, तुकाराम सानप, सचिन आव्हाड, भाऊसाहेब मुठाळ, रवींद्र विंचू, सुरेश कांगणे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार, आदर्श प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक चंद्रकांत खाणकरी यांच्यासह परिसरातील पालक, ग्रामस्थ, आजीमाजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. माजी विद्यार्थी सचिन गायधनी आणि किरण घुगे यांनी विद्यार्थ्यांना शुभसंदेश दिला. पळसे ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या वृक्षरोपांचे रोपण करण्यात आले.

सामुदायिक कवायतीसह प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आल्यानंतर विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळकृष्ण अंजनगावकर, श्रीमंत श्री नर्सरीचे संचालक हिरामण आडके, शिक्षक कैलास लहांगे, शिक्षिका श्रीमती एस.एल.वाणी यांच्या वतीने ओम रोकडे, ओम जाधव, वैष्णवी आडके, श्रावणी गायधनी, आर्यन सानप, श्रावणी मुठाळ या मार्च-२०२६ च्या दहावी शालांत परीक्षेतील गुणवंतांचा रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. दरवर्षाप्रमाणे ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमात माजी विद्यार्थी ॲड.जयवंत गायधनी यांच्याकडून तीस विद्यार्थ्यांना स्कूलशूज, सामाजिक कार्यकर्ते सागर कटारे यांच्याकडून दहा विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, पोलीस दलात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी किरण घुगे यांच्याकडून बारा स्कूलबॅग, स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेकडून चार गणवेश, देवळालीकॅम्प येथील आर्यन ड्रेसेस यांच्याकडून दहा गणवेश, पळसे येथील त्र्यंबकेश्वर फुड्स लि. कारखान्याकडून पारले बिस्कीट बॉक्स, माजी विद्यार्थी सुदाम सानप यांच्याकडून वह्या, माजी विद्यार्थी नवनाथ मुंजे, सचिन गायधनी यांच्याकडून चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. सिमेन्स कंपनीत क्वॉलिटी इंजिनियरपदी निवड झाल्याबद्दल ओमकार कांगणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दहावीतील पूजा मुठाळ या विद्यार्थिनीने वाढदिवसानिमित्त विद्यार्थी वाचनालयास ग्रंथभेट दिली. विद्यार्थ्यांसह दोन्ही विद्यालयांच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.

