
वडाळी (प्रतिनिधी ) माध्यमिक विद्या मंदिर वडाळी बु.येथे दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला निमित्ताने विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा मुख्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभात फेरीने करण्यात आली.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. नागेश रामभाऊ सांगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रीय नशामुक्ती व तंबाखूमुक्ती जनजागृती अभियान
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले व नशामुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.

तसेच तंबाखूमुक्तीची शपथ घेऊन तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प करण्यात आला. शासन नियमाप्रमाणे विद्यालयातील उपशिक्षक श्री. घुगे सर यांच्या मार्गदर्शनाने संगीत कवायत संचलन करण्यात आले
📚 परीक्षेतील गैरमार्गांविरुद्ध विद्यार्थ्यांचा संकल्प
इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून प्रामाणिकपणे व मेहनतीने परीक्षा देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
“परीक्षेपूर्वी व परीक्षेच्या काळात कोणत्याही गैरमार्गाचा विचारसुद्धा करणार नाही, प्रामाणिकपणे अभ्यास करून स्वतःच्या कष्टावर परीक्षा देईन,” असा विद्यार्थ्यांनी संकल्प केला. वरील दोन्ही प्रतिज्ञांची शपथ विद्यालयाचे उपशिक्षक श्री आढाव सर यांनी दिली.

पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आजचा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सहभागाने व सामूहिक प्रयत्नांनी अतिशय उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला.
कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रतिष्ठित पालक व मान्यवरांनी विद्यालयाच्या नियोजनाचे, विद्यार्थ्यांच्या सहभागाचे तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आणि समाधानाचे शब्द हे आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे खरे यश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ कलाशिक्षक श्री एस टी वाघ सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचा शेवट विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सदगीर एस. एम.सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघ वडाळी बु. संस्थेचे अध्यक्ष श्री नागेश रामभाऊ सांगळे, उपाध्यक्ष श्री. श्री. मधुकर अण्णा नंद, सचिव श्री तुळशीराम नवनाथ पाटील सर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!

