प्रा.अरुण बुंदेले यांच्या अभंग गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

अमरावती : ( प्रतिनिधी )
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड,शाखा अमरावतीचा ३८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. राजाभाऊ देशमुख तळवेलकर (माजी अध्यक्ष, प्रादेशिक मंडळ नागपूर दि महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक लिमिटेड मुंबई. ) होते तर
उद्घाटक श्री बबनरावजी आवारे ( अध्यक्ष, जिजाऊ कमर्शियल सह बॅक लिमिटेड, अमरावती )
प्रमुख अतिथी डॉ नंदकिशोर राऊत
(माजी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती ),श्री अनिलराव जवंजाळ ( अध्यक्ष, अमरावती मर्चंट को-ऑप. बँक लि, अम. ),श्री दिलीपराव लोखंडे (अध्यक्ष, महात्मा फुले अर्बन को. ऑप .बँक लि. अमरावती . ),श्री शिवाजीराव देठे ( सीईओ, अभिनंदन अर्बन को-ऑप. बँक लि., अमरावती ),श्री अश्विनजी चौधरी अध्यक्ष ,राष्ट्रमाता जिजाऊ अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., अमरावती), श्री बाळासाहेब वानखडे अध्यक्ष, ग्रामीण शिक्षण संस्था.सतीश बेडसे( व्यवस्थापक प्रा का नागपूर) श्री पंजाबराव धोटे होते.
अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वरचित ‘अभंग तरंग’ या काव्यसंग्रहातील ‘ भाऊ ज्ञानदीप ‘ या डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावरील अभंगाचे सुमधुर आवाजात गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
मा .राजाभाऊ देशमुख तळवेलकर
यांचे अध्यक्षीय भाषण
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजाभाऊ देशमुख तळवेलकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,बँकेच्या प्रगतीसाठी ग्राहकांचे हित राखणे आवश्यक आहे त्यासाठी बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या ग्राहकाशी संवाद साधून त्यांच्या इच्छा, आकांक्षा, गरजा पूर्ण करण्याकरता सहकार्य केले पाहिजे तसेच बँकेचे उद्दिष्ट हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे हित साध्य करून शेतीच्या विकासासाठी बँकेने हातभार लावला पाहिजे हेच खरे बँकेचे उद्दिष्ट आहे आणि या दोन्ही गोष्टी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्या यांच्या तर्फे होत आहे.त्यांनी शाखा व्यवस्थापक किशोर राऊत यांना विनंती केली की तुम्ही अमरावतीतील सहकारी बँक असोसिएशनच्या तर्फे सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांना करिता प्रशिक्षण सुरू करावे."
असे विचार व्यक्त केले .
बँकेने आपल्या ग्राहकांसोबत ऋणानुबंध जपले पाहिजे.
– बबनरावजी आवारे
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री बबनरावजी आवारे आपल्या मनोगतात म्हणाले की,"बँकेने आपल्या ग्राहकांसोबत ऋणानुबंध जपून बँकेचे खरे ध्येय धोरण सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे .या बँकेचे व्यवस्थापक किशोर राऊत अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत व बँकेचा विकास करीत आहेत."असे मत व्यक्त केले.
बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.नंदकिशोर राऊत,श्री अनिलराव जवंजाळ, श्री दिलीपराव लोखंडे, श्री शिवाजीराव देठे, श्री आश्विनजी चौधरी, श्री सुभाषजी तेजनकर, श्री पंजाबराव धोटे या सर्व प्रमुख पाहुण्यांनी बँकेचे विविध उपक्रम व कार्याची माहिती सर्व उपस्थित खातेदार व ग्राहकांना आपल्या मनोगतातून करून दिली.
38 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री किशोर राऊत (शाखा व्यवस्थापक अमरावती ) यांनी बँकेच्या
याशाची गाथा कथन केली.
बँकेचे प्रशासक मा. विद्याधरजी अनास्कर यांनी सुरू केला सर्व शाखांचा वर्धापनदिन
शाखेचा वर्धापनदिन कसा सुरू झाला या बाबतीत किशोर राऊत यांनी सांगितले की प्रशासक मा.विद्याधरजी अनास्कर ,व्यवस्थापकीय संचालक मा.दिलीपजी दिघे साहेब, मुख्य सरव्यवस्थापक डॉ .अशोक माने तसेच सर्व वरीष्ठ अधिकारी यांच्या संकल्पनेतून सुरू झाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची उत्तरोत्तर प्रगती कशी सुरू आहे तसेच बँकेवरील असेलेला खातेदार व कर्जदार यांचा विश्वास कसा दृढ करावा व सेवा कशी द्यायला हवी तसेच शाखेचा लेखाजोखा व सेवा या बाबत माहिती दिली.
सर्व पाहुण्यांचा बँकेचे व्यवस्थापक श्री किशोर राऊत यांनी शाल आणि गुलाब वृक्ष देऊन सत्कार केला. ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेचे ग्राहक सदस्य यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला , ही विशेष उल्लेखनीय बाब होती.ज्या मुळे बँक घराघरात पोहचली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गजानन सोनोने व आभार प्रदर्शन श्री साहिल काकडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर राऊत, प्रा.बाबुराव शेळके,अविनाश वाटाणे,अनिता राऊत, पल्लवी ठाकरे,साहील काकडे, अनिल चव्हाण, मानकर यांनी अथक परिश्रम घेतले .याप्रसंगी बहुसंख्य ग्राहक सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने झाली.

