
साहित्य महोत्सव आयोजक डॉक्टर सुशील कुमार देवराम शिंदे यांचा उत्कृष्ट आयोजन बद्दल सन्मान करताना सुहास टिपरे जेष्ठ साहित्यिक, डॉक्टर प्रदीप कुमार कळस्कर व विनोद बैरागी!!
नासिक = ( प्रतिनिधी ) ” एखादा अनुभव, अनुभूती हृदयात खोलवर रुततें, आणि मग त्यातून आपण व्यक्त होतो, हे व्यक्त होणे महत्वाचे असते. आणि मग त्या साठी शब्द, भाव भावना, व्याकरण इत्यादी गोष्टी साहाय्य भूत ठरतात, आणि मनापासून सुचलेले असते तें काव्य असते असे उदगार जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी काढले. साहित्य रंग साहित्य मंच आयोजित “” शब्दांजली “” या साहित्य महोत्सव मध्ये प्रमुख अतिथी या पदावरून सुहास टिपरे बोलत होते. सुहास टिपरे पुढे म्हणाले कि कविता हा आत्म्यातून व्यक्त होणारा हुंकार आहे आपल्या मनातील भावना यांना आपल्या शब्दाच्या माध्यमातून व्यक्त झाले कि सर्वोत्तम कवितेची निर्मिती होते. डॉक्टर सुशील कुमार देवराम शिंदे आयोजक, डॉक्टर प्रदिपकुमार कळस्कर जळगाव व विनोद बैरागी या प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थिती मध्ये साहित्य महोत्सव मोठया दिमाखात क्रिसेंडो स्टुडिओ सभागृह कालिका टॉवर नासिक येथे यशस्वी पणे पार पडला. संपूर्ण साहित्य महोत्सव चे यशस्वी सूत्रसंचालन खुशाली पवार यांनी केलें. संपूर्ण कार्यक्रम च्या मुख्य स्पर्धा चे परीक्षण डॉक्टर सुशील कुमार शिंदे यांनी केलें या साहित्य महोत्सव मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचा निकाल हा पुढीलप्रमाणे आहे विभाग एक लेख चषक स्पर्धा प्रथम क्रमांक = सौं वैशाली सूर्यवंशी, द्वितीय क्रमांक = सुनील शिरसाठ, तृतीय क्रमांक = कुशल दुसाने यांनी पटकवला. विभाग दोन काव्य चषक स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक = योगेश पानपाटील, द्वितीय क्रमांक = प्रीती सोनवणे, तृतीय क्रमांक = सुनील शिरसाठ यांना मिळाला. विभाग तीन ओपन स्पर्धा स्वर्गीय विमल हरिश्चंद्र टिपरे स्मरणार्थ प्रथम क्रमांक = प्रीती सोनवणे, द्वितीय क्रमांक = अश्विनी पुरी, तृतीय क्रमांक =संतोष जाधव यांनी मिळवला. उ्तेजनार्थ प्रथम सोनाली चव्हाण, उन्नती नाकील व श्रावणी खातंळे, सम्रादणी सूर्यवंशी सुवर्णा कळस्कर व रवींद्र दुसाने यांनी मिळवलंl आहे. प्रश्न मंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक कांचन दांडेकर, द्वितीय संतोष जाधव व तृतीय अनिता रोकडे यांनी पटकावला आहे याचे परीक्षण सुनील शिरसाठ यांनी केलें संपूर्ण कार्यक्रम चे यशस्वी आयोजन डॉक्टर सुशील कुमार शिंदे यांनी केल्या बद्दल संपुर्ण व्यासपीठाचे मान्यवर यांनी सुशील कुमार शिंदे यांचा सन्मान केला. संपुर्ण साहित्य महोत्सव साठी अहिल्या नगर, ठाणे, संभाजी नगर इगतपुरी मुंबई पुणे येथून साहित्य रसिक यांनी येऊन कार्यक्रम यशस्वी केला!

या संपूर्ण कार्यक्रम मध्ये दिवसाची विशेष व्यक्ती हा सन्मान संतोष तावडे यांनी मिळवला आहे सर्वांनी त्यांचे अभिनंदन केलें आहे!

