
लासलगाव, ( प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता, तरुणाईचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्वरदा कटारे व समूहाने स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांनी महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना हे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व सेवाभाव निर्माण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले.

याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. भूषण हिरे व उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा. उज्वल शेलार यांनी देखील राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात डॉ. सोमनाथ आरोटे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य होत असल्याचे सांगत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. देवेंद्र भांडे यांनी केले. तर सूत्रसंचालन कृष्णा दराडे व दीप्ती वाकचौरे यांनी केले. प्रा. सुनील गायकर यांनी आभार मानले. राष्ट्रीय सेवा योजना गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
यावेळी प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे, उपप्राचार्य प्रा. भूषण हिरे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा. उज्वल शेलार, प्रा. किशोर गोसावी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. देवेंद्र भांडे, प्रा. सुनील गायकर व सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदरावजी होळकर यांचे कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन लाभले.

