
ढेकू (.प्रतिनिधी ) ढेकू आश्रम शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत विभाग स्तरावर निवड ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी (खेळाडू) कु अक्षरा हेमराज चव्हाण खेळाडू हिने दिनांक 24/ 9/ 2026 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय ( मीनाताई ठाकरे स्टेडियम जिल्हा क्रीडा संकुल नाशिक ) येथे शासकीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा पार पाडल्या त्यामध्ये कु अक्षरा हेमराज चव्हाण इ १०वी (माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी)हिने जिल्ह्यात (नाशिक)प्रथम क्रमांक मिळवत विभागीयस्तरावर निवड झाली आहे. तिचे इ.मा.ब कल्याण विभाग नाशिक चे सहाय्यक संचालक मा.श्री संतोष चव्हाण साहेब यांनी सत्कार केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक सरचिटणीस मा कृष्णरावजी नेरे (सर) ,संस्थेचे अध्यक्ष मा श्री योगेशजी हिरे व सर्व संचालक पदाधिकारी यांनी कौतुक केले . तिला शाळेचे मुख्याध्यापक श्री जे एम थोरात , क्रीडा प्रशिक्षक श्री बी के देवरे, श्री कामडी एस एम,चव्हाण आर बी श्री धाकतोडे आर जी शाळेचे अधीक्षक श्री नितानकर एन इ आदिचे मार्गदर्शन लाभले .शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ( १ ली ते १० वी)विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

