
पाताळेश्वर ( प्रतिनिधी ) नुकतेच जिल्हास्तरीय टेनिकॉईट स्पर्धा दिनांक ६/०९/ २०२६ ते दि. ८/९/२०२६ रोजी मराठा हायस्कूल,नाशिक येथे पार पडल्या. या जिल्हास्तरीय टेनिकॉईट स्पर्धेत पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या सहा संघांनी घवघवीत यश प्राप्त करून त्यांची विभाग पातळीवर निवड झाली. यात १४ वर्षाआतील मुलींच्या संघा त आरोही शिंदे, प्रतीक्षा शिंदे, संस्कृती सहाणे, श्रुती जाधव, वैष्णवी जाधव तर मुलांच्या संघात सार्थक शिंदे,अभिषेक रेवगडे, सार्थक भोर, साहिल रेवगडे, आयुष शिंदे, कार्तिक पाटोळे या संघांनी प्रथम क्रमांक मिळविला.

१७ वर्षाआतील मुलींच्या गटात सायली शिंदे,ज्ञानेश्वरी वारुंगसे, श्वेता सहाणे, वैष्णवी बोगीर,अंकिता कडाळे तर मुलांच्या संघात श्रेयश वाघ, साहिल चव्हाण, गौरव शिंदे, आशिष जाधव, आदित्य जाधव, हर्षद बोगीर हे होते.१७ वर्षाआतील मुलींच्या गटात स्वरांजली पाटोळे, माया रेवगडे, श्रद्धा सहाणे, अनुजा रेवगडे, अनुराधा झाडे तर मुलांच्या गटात श्रवण रेवगडे, अनुज शिंदे, अविनाश रेवगडे, कार्तिक बोगीर, सक्षम जाधव या सर्व विद्यार्थ्यांची नंदुरबार येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व नियम समजून घेत सराव करणे आवश्यक आहे, सरावातूनच खेळ आत्मसात होतो, त्यामुळे दररोज दोन तास सराव करावा असे सांगितले संस्थेचे कोषाध्यक्ष टी.के. रेवगडे व विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.टी.गिरी यांनीही शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका श्रीमती शेख एम.एम.यांचे मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक सविता देशमुख, सी.बी. शिंदे, के.डी.गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के.पी.साठे, ए. बी. थोरे उपस्थित होते.

