
नाशिकरोड :(. प्रतिनिधी ) मराठी राजभाषा सप्ताह निमित्त पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय येथे जुन्या संदर्भ पुस्तकांसह, ज्ञानकोश, विश्वकोश,कविता,बालसाहित्य,हस्तलिखिते अशा पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या माजी व विद्यार्थीप्रिय मराठीच्या शिक्षिका कल्पना वैद्य यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य संजय पाटील,मराठी विषय शिक्षिका सुरेखा म्हसकर, ग्रंथपाल विलास सोनार आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात १९३४ ते २०१७ सालापर्यंत मराठी विषयाचे बदलेल्या अभ्यासक्रमाचे क्रमिक क संदर्भ पुस्तके ठेवण्यात आले होते. यावेळी आण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा व माझा भाऊ आण्णाभाऊ यांच्या साहित्याचे वाचन नववी ब च्या विद्यार्थ्यांनी केले. त्यांना सुरेखा म्हसकर यांचे मार्गदशन लाभले. प्रदर्शनात जुने संदर्भ पुस्तके पाहून कल्पना वैद्य यांनी पुस्तकांच्या अध्यापनाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व प्रदर्शनाचे कौतुक केले.
मराठी राजभाषा सप्ताह निमित्त पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी गटाकरिता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी नाशिकरोड येथील शासकीय विभागीय ग्रंथालयास शाळेच्या इयत्ता सातवी व आरंभ महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी संदीप सरोदे, रवींद्र अलई,ऋषिकेश जाधव, यशवंत सूर्यवंशी,पुष्पलता सुर्वे,जयश्री पगार ग्रंथपाल विलास सोनार, प्राचार्य संजय पाटील उपप्राचार्या संगीता पवार आदी उपस्थित होते. शासकीय विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले यांनी ग्रंथालयाची माहिती देवून विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी ग्रंथालयाचे सभासद व्हावे असे आवाहन केले.

