
मूळडोंगरी ( प्रतिनिधी ) , दि. २ ऑक्टोबर २०२६ : सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळडोंगरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व शांततेच्या विचारांचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व देशसेवेच्या कार्याचे महत्त्व सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी या महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्याची माहिती जाणून घेतली. तसेच स्वच्छता, शिस्त, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रती कर्तव्यभावना जोपासण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

