
आईच्या स्मरणार्थ शैक्षणिक संस्थांना उदार अंतःकरणाने दिली देणगी.
सिन्नर.( प्रतिनिधी )
समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रेरणादायी संकल्प असला की सामाजिक बांधिलकीचा जन्म होतो.डाॅ.भरत गारे आणि त्यांच्या कुटुंबियांनी तालुक्यातील शैक्षणिक संस्थांना लाखो रूपयांची दिलेली देणगी ही या मातीचं ऋण फेडणारी आहे.अशा भावना सिन्नर येथील डॉ गारे कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
या मदतीचे धनादेश त्यांनी मविप्र संस्थेचे संचालक शिवाजी गडाख यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी खा.पराग वाजे.युवा नेते ऊदय सांगळे. सेवानिवृत्त तहसिलदार महामित्र दत्ता वायचळे.राजकीय विश्लेषक नामदेवराव कोतवाल. भारत कोकाटे.नगरसेवक ऊदय गोळेसर.मनोज देशमुख .डॉ विजय लोहारकर. गोविंद लोखंडे उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख.सौ शितल कानडी डॉ विष्णु अत्रे अॅड.पंढरीनाथ चांदोरे.ई के भाबड विष्णुपंत चांदोरे अॅड.संजय सोनवणे मनिष गुजराथी सुदाम वाळके.रघुनाथ बरकले अशोकराव डावरे प्रेस कामगार नेते हिरामण शिंदे ज्ञानेश्वर चांदोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
दिवंगत पुंजाबाई हरी गारे यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त डॉ भरत गारे व माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ प्रतिभाताई गारे यांनी तालुक्यातील नांदुर शिंगोटे.व पाडळी येथील विद्यालय तसेच दातली येथील विद्यालयाला साडेतीन लाख.शहापुर.धोंडवीर नगर मनेगाव येथील प्राथमिक शाळेला पन्नास हजार रुपये.तसेच सिन्नर येथील मविप्र महाविद्यालयाला पाच लाख रुपयांची फिक्स डिपाॅझीट तर क्रांतीवीर व्हि. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या दातली येथील विद्यालयाला साडेतीन लाख रूपये मदत दिली आहे. या रकमेतून आलेल्या व्याजातुन मला अधिकारी व्हायचे आहे.या योजनेतंर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.याशिवाय दिवंगत वडील हरी दादा गारे यांच्या स्मरणार्थ दातली येथे अभ्यासिका चालवुन डॉ श्री व सौ गारे यांच्या दातृत्वातुन अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी निवड होण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.
डाॅ.भरत गारे सौ प्रतिभा गारे यांनी लायन्स क्लब व जिजामाता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक भरीव उपक्रम राबवुन सामाजिक सेवेचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे.. दिवंगत मातोश्रींच्या स्मृतीदिनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या सामाजिक सेवेचे योगदान पहाता. त्यांच्या कार्याचा गौरव तालुक्यातील अनेकांनी केला आहे.

