
सेलू 🙁 प्रतिनिधी ) बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल, सेलू येथील विद्यार्थिनी पर्व काला हिने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या उल्लेखनीय यशामुळे तिची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पर्व कालाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामागे नियमित सराव, जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका रितू श्रीवास्तव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बॅडमिंटन प्रशिक्षक सिद्धेश्वर भैरट सर यांच्या प्रशिक्षणामुळे पर्व काला हिला हे यश संपादन करता आले.
या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्ष भावनाताई बोर्डीकर (मुंगसे) यांनी पर्व काला हिचे अभिनंदन करून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील शिक्षकवृंद व क्रीडाप्रेमींनी तिच्या यशाचे कौतुक केले.
पर्व काला हच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून, विभागीय स्तरावरही ती उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

