
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४२० वा दिवस

‘या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।’
सर्व प्राण्यांच्या ठिकाणी चैतन्यरूपाने प्रकटणाऱ्या त्या भगवती जगन्मातेला पुनः पुनः, पुनः पुनः प्रणाम असो.” ती जशी सुखात नि उदात्ततेत विराजमान आहे तशीच दुःखा-कष्टात, तहान-भुकेतही विद्यमान आहे. हा जो भुंगा फुलांतला मध चाखीत आहे, ते तरी काय? तो प्रभूच त्याच्या रूपाने मधुपान करीत आहे. सर्वत्र तो प्रभूच भरलेला आहे हे जाणून ज्ञानीजन निंदा आणि स्तुती दोन्ही सोडून देतात. अगदी पक्के जाणून असा की, काहीही तुमचे अनिष्ट करू शकणार नाही. कसे करील? तुम्ही स्वरूपतः मुक्त नाही काय ? तुम्ही आत्मा नाही काय? तो आपल्या प्राणांचा प्राण, कानांचा कान, डोळ्यांचा डोळा आहे.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास १९ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द प्रतिपदा
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६
★ घटस्थापना, शारदीय नवरात्र उत्सवारंभ
★ संत मुक्ताबाई जयंती.
★ १९१६ रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी देणारे, समाजसुधारक, संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्मदिन.
★ १९६८ ‘ग्रामगीता’ ग्रंथाचे लेखक, राष्ट्रसंत माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

