
निफाड / सुंदरपूर, ( प्रतिनिधी ) दि. ११ ऑक्टोबर २०२६ -*महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने दिला जाणारा मानाचा *’ऊस भूषण कार्य गौरव पुरस्कार – २०२५’* निफाड तालुक्यातील सुंदरपूर येथील प्रयोगशील शेतकरी *श्री. विजय बाळासाहेब सोमवंशी* यांना जाहीर झाला आहे.याबाबत संघाचे संस्थापक अध्यक्ष *मा. श्री. अतुल नाना माने-पाटील* व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष *मा. श्री. महेंद्र घाटगे* यांनी पत्राद्वारे (जा.क्र. १३२५/निवडपत्र २०२६, दि. १०/१०/२०२६) ही माहिती दिली आहे.पत्रात म्हटले आहे की, _”आपण ऊस क्षेत्रात मोठ्या कष्टाने नवी वाट चोखाळण्याचा प्रयत्न करीत आहात. ही वाटचाल एकरेषीय आणि साधी-सरळ राहिली नाही, कारण तुम्हाला अनेक संकटे, आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला. परंतु आपण उमेद न हारता कल्पकता, जिद्द आणि प्रयत्नाच्या बळावर त्यावर मात केली आणि उल्लेखनीय यश प्राप्त केले. आपले हे कार्य इतरांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे. आपल्या या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन आपली ‘ऊस भूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.”_हा पुरस्कार सोहळा *दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता, श्री विघ्नहर गणपती मंदिर ट्रस्ट, भक्त भवन १, ओझर, ता. जुन्नर, जि. पुणे* येथे होणार आहे.विजय सोमवंशी हे *सोमेश्वर नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे* मार्गदर्शक असून त्यांनी कमी खर्चात नैसर्गिक पद्धतीने ऊस शेतीचा नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या पुरस्कारामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या व निफाड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे
संपर्क:महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ, मुख्य कार्यालय – ‘ऊस भवन’, उंदरगांव, ता. माढा, जि. सोलापूर
बातमी पाठवणारे: सोमेश्वर नैसर्गिक शेती शेतकरी गट, सुंदरपूर (निफाड)

