
.लातूर: ( प्रतिनिधी ) श्री नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राणी अंकुलगा तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथील प्राचार्य बालाजी शंकरराव महावरकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांची ‘Best Principal in School’ या मानाच्या पुरस्कारासाठी मेरिटच्या आधारे निवड करण्यात आली. मुंबई येथील NESCO येथे Times of India यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या AI Technology in Education / Education Supply Finance Expo 2020 / Star Awards Education Awards 2026 या प्रतिष्ठित व्यासपीठावर त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.या उल्लेखनीय यशाबद्दल समस्त ककय्या समाज महासंघाच्या वतीने लातूर येथे प्राचार्य बालाजी महावरकर यांचा जिल्हाध्यक्ष श्रीमंत कावळे यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.यावेळी माजी आ. धर्माजी सोनकवडे, मुख्याध्यापक गणेश सावळकर, प्रा. डॉ. महावीर कटके, उद्योजक बालाजी कोकणे, कवी तथा अभियंता ॲड. मैलारीराज कावळे पाटील, प्रा. लक्ष्मीकांत खरटमोल, प्रा. श्यामसुंदर शेरखाने, आणि दादाराव कटके (रेणापूर) महेश महावरकर,यांची उपस्थिती होती.प्राचार्य महावरकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर घेतली गेल्याने शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे समाजाची मान उंचावली असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

