
नांदगाव ( प्रतिनिधी ) नांदगाव तालुक्यातील कासारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीयुत नाना बुधा कर्नर यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा सत्कार मोरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक गणेश बागुल सर,उपशिक्षिका योगिता कापुरे मॅडम यांनी शाल व पुष्प देवून केला.याप्रसंगी त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देवून गोरगरीब,शेतकरी कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा,अशी अपेक्षा व्यक्त केली असता सत्कारार्थी श्रीयुत नाना कर्नर यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या शैक्षणिक,अध्यात्मिक व सामाजिक कार्याची थोडक्यात माहिती याप्रसंगी दिली.

