
सोलापूर 🙁 प्रतिनिधी )प्रा. भगवान इंगळे लिखित ‘लोभस’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे राहणार आहेत.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, ‘प्रहार’चे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक संयोजक डॉ. प्रा. विश्वनाथ साळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. खासदार प्रणिती शिंदे आणि प्रा. आशा इंगळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक करणार आहेत.
भगवान इंगळे यांच्या लेखनातून साकारलेल्या ‘लोभस’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने साहित्यप्रेमींना लेखकाच्या साहित्यविश्वाची ओळख करून घेण्याची संधी मिळणार आहे. या सोहळ्यास साहित्य, पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

